जिला

लोहा शहरात बंजारा समाजाचा शक्तीप्रदर्शन मोर्चा – हैद्राबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणाची मागणी

 

लोहा (प्रतिनिधी) – “हैद्राबाद गॅझेटनुसार आम्हाला एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे” या मागणीसाठी आज लोहा शहरात बंजारा समाजाच्या वतीने काढण्यात आलेला भव्य मोर्चा मोठ्या उत्साहात पार पडला. या मोर्चात पुरुष, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा हजारो समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता. संपूर्ण शहर या मोर्चामुळे दणाणून गेले.

मोर्चाच्या सुरुवातीस समाजातील ज्येष्ठांनी भगवान सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात केली. हातात झेंडे, बॅनर व मागण्यांचे फलक घेऊन बंजारा समाजबांधवांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. “एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे”, “हैद्राबाद गॅझेट लागू करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या मोर्चात बंजारा समाजाचे विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सकल मराठा समाजाचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. त्यामुळे हा मोर्चा अधिक प्रभावी ठरला. मोर्चाच्या मार्गावर नागरिकांनीही ठिकठिकाणी समाजबांधवांचे स्वागत केले.

मोर्चा संपल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून कायमस्वरूपी आरक्षण द्यावे, या मागणीसह समाजाच्या इतर विविध प्रश्नांकडे शासनाने सकारात्मक दृष्टीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता. मात्र मोर्चा शांततेत, शिस्तबद्ध आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता संपन्न झाला. समाजातील महिलांचा व युवकांचा सहभाग लक्षणीय होता.

समाजाच्या मागण्यांकडे शासनाने तत्काळ लक्ष द्यावे, अन्यथा लढ्याची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा नेत्यांनी यावेळी दिला.
छायाचित्र : विनोद महाबळे

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *