मराठवाडा

नांदापूर ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) चे यशस्वीपणे कार्यान्वित

 

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात नांदापूर ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले. यामुळे अकोला–पूर्णा विभागातील वीज पुरवठा क्षमतेत मोठी भर पडली आहे.

अकोला–पूर्णा हा सुमारे 206 किमी लांबीचा विभाग पूर्णपणे विद्युतिकृत असून या मार्गावर प्रवासी तसेच मालगाड्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते. एकेरी विद्युतिकृत मार्गावर साधारणपणे प्रत्येक 100 किमी अंतरावर एक ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) आवश्यक असते. त्यानुसार या विभागासाठी दोन ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) चे नियोजन करण्यात आले होते – जौलका ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) 2024 मध्ये कार्यान्वित करण्यात आले होते आणि आता नांदापूर ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS), यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले.

नांदापूर ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) सुरू झाल्याचे प्रमुख फायदे:

• अकोला–पूर्णा विभागास स्थिर व विश्वासार्ह वीज पुरवठा.
• पूर्वी होत असलेली व्होल्टेज कमी होण्याची समस्या व गाड्यांचे थांबणे यावर नियंत्रण.
• प्रवासी व मालगाड्यांची गती सुधारणा व कार्यक्षमता वाढ.
• गाड्यांची वेळेवर धावण्याची क्षमता (पंक्चुअॅलिटी) अधिक दृढ.

नांदापूर ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) चे कार्यान्वित हे रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी व प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच मालवाहतुकीच्या कार्यक्षमतेसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *