क्राईम

शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई – बनावट नोटा प्रकरणी तिघे जेरबंद, 1.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड (प्रतिनिधी) – शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत बनावट नोटा ताब्यात बाळगणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली. या कारवाईत एकूण 1,73,500/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी महेश कृष्णाजी तुतारे (वय 31, व्यावसायिक व्यापारी, रा. मगणपुरा, नांदेड) सोनुसिंग पि. मुखत्यारसिंग चहाल (वय 28, व्यवसाय – गुरुद्वारा सेवादार, रा. नगिनाघाट, नांदेड) मसु पांडुरंग शेंडगे (वय 50, रा. सिडको महानगर, छत्रपती संभाजीनगर)

महेश तुतारेच्या ताब्यातून 500 रुपयांच्या 73 बनावट नोटा, किंमत 36,500/-
सोनुसिंग चहालच्या ताब्यातून 500 रुपयांच्या 194 बनावट नोटा, किंमत 97,000/-
स्कुटी (MH-26 BB-0674) किंमत 40,000/- एकूण जप्ती 1,73,500/-

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुरू केलेल्या “ऑपरेशन फ्लश आऊट” मोहिमेअंतर्गत अवैध व्यवसायावरील कारवाया सुरू आहेत. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांचे गुन्हे शोध पथक दि. 20 सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मगणपुरा येथील एम.एम. होंडा शोरूमजवळ कारवाई केली.

यावेळी आरोपी महेश तुतारे आणि सोनुसिंग चहाल हे दोघे बनावट 500 रुपयांच्या नोटांचा वापर करण्याच्या उद्देशाने 267 नोटा (किंमत 1,33,500/-) ताब्यात ठेवलेले आढळले. त्यांच्याकडून नोटा व स्कुटी जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. चौकशीत या दोघांनी कबुली दिल्यानंतर मसु पांडुरंग शेंडगे याच्याकडून त्यांनी नोटा घेतल्याचे समोर आले. त्यानुसार शेंडगेला देखील ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद साजीद हुसैन आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, बनावट नोटांच्या मागील साखळी व इतर आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *