बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेसाठी माजी नगरसेवक ॲड. चौदंते यांनी केले अनोखे ‘लोटांगण’ आंदोलन

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम
दि २२ सप्टेंबर २०२५ रोजी, मुदखेड येथील मोंढा बाजार परिसरात, रस्त्यांच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक ॲडव्होकेट कमलेश चौदंते यांनी अनोखे ‘लोटांगण’ आंदोलन केले.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील श्री गणेश मंदिरासमोर त्यांनी अर्धनग्न होऊन प्रशासनाचा निषेध केला.
हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, मोठ्या आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. याच मार्गावरून गांधी विद्यालय आणि केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी ये-जा करतात. तसेच, शहरातील सर्व धर्मीय लोक हाच रस्ता वापरतात.
अशा महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था पाहून ॲडव्होकेट चौदंते यांनी प्रशासनाविरुद्ध हे आंदोलन करत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाने स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला आहे आणि लोकांमध्येही याविषयी चर्चा सुरू झाली आहे.



