क्राईम

इतवारा गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई – काही तासांत चोरी उघडकीस आरोपी जेरबंद

 

नांदेड – इतवारा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जलदगतीने कारवाई करत चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे. या कारवाईत 1,25,773/- किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत** करून एक आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.

अटक आरोपी मोहम्मद मुजाहीद पि. मोहम्मद हाजी (23), व्यवसाय – मजुरी, रा. मिल्लतनगर, देगलूरनाका, नांदेड

जप्त माल
सोन्याची मोरणी – 420 मि.ग्रॅ. – किंमत 25,000/- रु.
सोन्याचे गंठण – 7.480 ग्रॅम – किंमत 25,000/- रु.
सोन्याची रिंग – 2.900 ग्रॅम – किंमत 35,500/- रु.
सोन्याची रिंग (स्टोनची) – 3.540 ग्रॅम – किंमत 18,970/- रु.
सोन्याची रिंग – 3.520 ग्रॅम – किंमत 21,303/- रु.

फिर्यादी हमीदखॉन पि. गौसखॉन (35), व्यवसाय – व्यापार, रा. साईनगर, खोजा कॉलनी, इतवारा, नांदेड यांनी दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन इतवारा येथे तक्रार दिली. तक्रारीनुसार, दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8.45 वाजता, परिवारासह जेवत असताना अज्ञात चोरट्याने घराच्या वरच्या मजल्यावरील कपाटातील लॉकरमधून सोन्याचे दागिने, एकूण 1,25,773/- किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.उपनिरीक्षक रमेश गायकवाड व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे जलदगतीने केला. काही तासांच्या आत संशयित इसम मोहम्मद मुजाहीद याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले दागिने मुद्देमालासह हस्तगत करण्यात आले आहेत.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *