शहर

नवघाट पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे पाणीची पाईपलाईन वाहून गेले, चौपाळा परिसर पाणीटंचाईच्या संकटात

 

नांदेड शहरातील नवघाट परिसरात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः नवघाट पुलावरून टाकलेली आसदवाण–चौपाळा पाणीची टाकीला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन वाहून गेल्याने शहरमध्ये मोठी पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नदीला आलेल्या प्रचंड पुराच्या पाण्याचा प्रवाह पुलावरून धोकादायक स्वरूपात सुरू होता. नदीपात्रात प्रचंड प्रमाणात पाणी वाढल्याने पुलावरून पाणी वाहत होता. याच वेगवान प्रवाहात ही पाईपलाईन अडकून पूर्णपणे वाहून गेली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रखर होता की तो अंदाजे 15 ते 20 किलोमीटर प्रतितास एवढा असू शकतो. अशा तीव्र प्रवाहामुळे पाईपलाईन काही मिनिटांतच तुटून नदीत वाहून गेली.

या घटनेमुळे चौपाळा तसेच लगतच्या शहरातील नागरिकांसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. शहरातील महिलांना व मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. सर्वच स्तरातील लोकांना या पाईपलाईनच्या वाहून जाण्याचा मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. महापालिका टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *