नांदेड ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई – दोन इसम जेरबंद, दोन गावठी पिस्तुलांसह 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड – ग्रामीण पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोन इसमांना अवैधरित्या गावठी पिस्तुल बाळगलेले असताना जेरबंद करण्यात आले. या कारवाईत 60,000/- किमतीची दोन गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
अटक आरोपी सय्यद शाहीद सय्यद दस्तगीर (21), व्यवसाय – मजुरी, रा. रहीमपुर, वसरणी, नांदेड, बलबीरसिंघ प्रतापसिंघ जाधव (22), व्यवसाय – मजुरी, रा. गुरु रामदास यात्री निवास, वजिराबाद, नांदेड, एक आरोपी फरार – शेख आदिल शेख शकील, रा. रहीमपूर
जप्त दोन गावठी पिस्तुले एकूण किंमत – 60,000/-
त्या अनुषंगाने दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शोध पथकाने कारवाई केली.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर अरफात कॉलनी, वसरणी येथील नॅशनल टी हाऊस शेजारील गल्लीत छापा टाकण्यात आला. त्यात वरील दोन्ही इसम ताब्यात आले. अंगझडतीत प्रत्येकी एक गावठी पिस्तुल मिळाले. आरोपींनी सदर पिस्तुले शेख आदिल शेख शकील या इसमाकडून विक्रीसाठी घेतल्याचे कबूल केले.



