गाडी क्रमांक 17206 व 17019 एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल – गंगाखेड, लासूर व पूर्णा स्थानकांवर सुधारित वेळ लागू

गाडी क्रमांक 17206 आणि 17019 एक्सप्रेसच्या नियोजित वेळापत्रकात गंगाखेड, लासूर आणि पूर्णा स्थानकावरील वेळापत्रकात बदल
दक्षिण मध्य रेल्वेद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी व गाड्यांच्या वेळेचे अचूक पालन सुनिश्चित करण्यासाठी खालील गाड्यांच्या नियोजित वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रक खालील प्रमाणे आहे:
गाडी क्रमांक कुठून कुठे स्थानक सध्याचे वेळ सुधारित वेळ या दिनांक पासून लागू होईल
17206 काकिनाडा पोर्ट साईनगर शिर्डी गंगाखेड 00.54 / 00.55 00.04 / 00.05 22.11.2025
17206 काकिनाडा पोर्ट साईनगर शिर्डी लासूर 05.29 / 05.30 04.59 / 05.00 22.11.2025
17019 हिसार हैदराबाद पूर्णा 23.20 / 23.25 23.50/ 23.55 30.09.2025
सर्व प्रवाशांनी कृपया या बदलाची नोंद घ्यावी व प्रवासाची योजना सुधारित वेळेनुसार करावी. सुधारित वेळापत्रक संबंधित दिनांकांपासून लागू केले जाईल व प्रवासी माहिती प्रणालीमध्ये पराविष्ट करण्यात येईल.



