शहर

नांदेड : पुरामुळे जलवाहीनी क्षतिग्रस्त – ४ दिवस पाणीपुरवठा खंडित

 

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड शहरातील असदवन जलशुद्धीकरण केंद्रावरून किल्ला व चौफाळा जलकुंभाकडे नवघाट पुलावरून जाणारी मुख्य जलवाहीनी पुराच्या पाण्यामुळे गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली आहे. त्यामुळे या जलवाहीनीची तातडीने दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. मात्र, पाण्याची पातळी व सुरू असलेला पाऊस लक्षात घेता दुरुस्तीच्या कामास वेळ लागणार असल्याने २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत किल्ला व चौफाळा जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

किल्ला जलकुंभातून पुरवठा बंद होणारे भाग
गवळण गल्ली, गौतमनगर, पठाण गल्ली, बडानाला न्यू लाईन, सराफा, जोशी गल्ली, गाडीपुरा, नवघाट, नृसिंह गल्ली, मारवाड गल्ली, आयना महेल टेकडी, न्यू फतेह बुरुज , काळा पूल, नगर गल्ली, जुनी मारवाड गल्ली, सिडी घाट, अरब गल्ली, बुरुड गल्ली, कुंभार टेकडी, होळी, पाठक गल्ली, सयादान, हनुमान मंदिर दुध डेअरी आदी परिसर.

चौफाळा जलकुंभातून पुरवठा बंद होणारे भाग
सुळटेकडी (१, २), टॉपसन, हातजोडी, शाहीन दवाखाना, विनकर कॉलनी, मोमीनपुरा, गणीमपुरा, संघसेननगर, पिवळी बिल्डिंग, शांतिनगर, प्रितीनगर, बिलालनगर, महंतवाडी, भावेश्वरनगर, मंढई मोठी सप्लाय आदी परिसर.

याबाबत नांदेड वाघाळा महानगरपालिका नागरिकांना आवाहन करत असून, या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे अशी विनंती केली आहे. तसेच, विष्णुपुरी प्रकल्पाचे गेट उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून येत असल्याने पाणी गढूळ येण्याची शक्यता असल्याचेही कळविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी पिण्यापूर्वी गाळून व उकळूनच वापरावे असे सांगण्यात आले आहे.

(पाणी हेच जीवन आहे — त्याचा योग्य वापर करा व अपव्यय टाळा!)
शहर अभियंता, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *