धम्म चक्र प्रवर्तन दिवस निमित चार विशेष गाड्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त, नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे मार्फत नांदेड ते नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. याचा तपशील पुढीलप्रमाणे:
विशेष रेल्वेगाडी सेवा तपशील
o गाडी क्रमांक 07085 नांदेड ते नागपूर हि गाडी मुदखेड, भोकर, हिमायत नगर, किनवट, आदिलाबाद, पिंपळकुट्टी मार्गे धावेल. हि गाडी नांदेड येथून दिनांक 01 ऑक्टोबर (बुधवार) रोजी रात्री 20:30 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.25. वाजता पोहोचेल.
• गाडी क्रमांक 07086 – नागपूर ते नांदेड हि गाडी नागपूर येथून दिनांक 02 ऑक्टोबर रोजी रात्री 23.55 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 08.३० वाजता पोहोचेल. या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल चे मिळून 20 डब्बे असतील
वेळा पत्रक
दिनांक आगमन-प्रस्थान स्थानक आगमन / प्रस्थान दिनांक
01.10.2025 (बुधवार) 20.30 नांदेड 08.30 03.10.2025(शुक्रवार)
20.58/21.00 मुदखेड 07.08/07.10
21.18/21.20 भोकर 06.38/06.40
22.13/22.15 हिमायत नगर 06.03/06.05
22.23/22.25 सहस्रकुंड 05.48/05.50
22.38/22.40 बोधडी 05.28/05.30
23.03/23.05 किनवट 05.08/05.10
02.10.2025(गुरुवार) 00.30/00.35 आदिलाबाद 04.25/04.30
02.01/02.02 पिंपळ कुट्टी 04.04/04.05 03.10.2025(गुरुवार)
02.10.2025(गुरुवार) 10.25 नागपूर 23.55 02.10.2025(गुरुवार)
2. गाडी क्र. 07087/07088 नांदेड-नागपूर-नांदेड विशेष गाडी मार्गे पूर्णा – बसमत-हिंगोली-वाशीम- अकोला
गाडी क्र. 07087 – नांदेड ते नागपूर हि विशेष गाडी दिनांक: 01 ऑक्टोबर 2025 (बुधवार) नांदेड येथून प्रस्थान वेळ: रात्री 21:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:10 वाजता, नागपूर येथे (02 ऑक्टोबर) ला पोहोचेल हि गाडी पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे धावेल.
गाडी क्र. 07088 – नागपूर ते नांदेड हि गाडी नागपूर येथून दिनांक: 03 ऑक्टोबर 2025 (शुक्रवार ) रात्री 01:00 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे त्याच दिवशी सकाळी 11:00 वाजता पोहोचेल. या गाडीत एकूण 20 डब्बे असतील ज्यात, जनरल, स्लीपर , एस.एल.आर. मिळून 20 डब्बे असतील
नांदेड-नागपूर-नांदेड मार्गे पूर्णा- बसमत-हिंगोली-वाशीम-अकोला
दिनांक आगमन – प्रस्थान स्थानक आगमन प्रस्थान दिनांक
01.10.2025 21.15 नांदेड 11.00 03.10.2025
22.00/22.30 पूर्णा 09.00/09.30
22.48/22.50 बसमत 08.08/08.10
00.13/00.15 हिंगोली 07.18/07.20
01.13/01.15 वाशीम 06.28/06.30
02.10.2025 03.45/04.10 अकोला 05.10/05.35 03.10.2025
02.10.2025 12.10 नागपूर 01.00 03.10.2025



