मराठवाडा

परभणी जिल्हा वकील संघाची निवडणूक संपन्न; ॲड. साहेबराव अडकिने अध्यक्षपदी विजयी..

 

परभणी (प्रतिनिधी): परभणी जिल्हा व सत्र न्यायालय वकील संघाच्या निवडणुकीत ॲड. साहेबराव अडकिने यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवत अध्यक्षपदाची प्रतिष्ठेची निवडणूक जिंकली. सचिवपदी ॲड. मदन बोबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
संघाच्या उपाध्यक्षपदी विनोद रसाळ, सहसचिवपदी ॲड. मृणाल देशमुख तर कोषाध्यक्षपदी ॲड. संतोष जाधव हे विजयी झाले. निवडणुकीच्या पारदर्शक प्रक्रियेसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून ॲड. एल. जी. दिवाण, ॲड. सुनील सावरगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली.

या सर्व नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ, सहकारी वकील तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी यथोचित सत्कार करून अभिनंदन केले. या निवडणुकीत उत्साहाचे वातावरण असून वकील संघाच्या नव्या नेतृत्वाकडून कार्यक्षमतेने संघटन मजबुतीकरणाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *