मराठवाडा
हाजी मोहम्मद फजलउलहक सिद्दीकी सरांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२५

सेलू (जि. परभणी) येथील यासेर उर्दू हायस्कूलचे शिक्षक हाजी मोहम्मद फजलउलहक सिद्दीकी यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक सेवांच्या गौरवार्थ एसोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स, मुंबई तर्फे ‘शिक्षणातील उत्कृष्टता राष्ट्रीय पुरस्कार – २०२५ ने सन्मानित करण्यात आले.
हाजी सिद्दीकी सर हे मोहम्मद सलीमउलहक सिद्दीकी यांचे सुपुत्र असून त्यांचे वडील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे वरिष्ठ लिपिक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर शाळा सोसायटीचे अध्यक्ष रहीम खान, मुख्याध्यापिका तहसीन सुल्ताना, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी सिद्दीकी सरांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



