नांदेड : काँग्रेस कमिटी तर्फे पुरग्रस्तांसाठी 5000 राशन किट वाटप

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड शहरात सलग दोन ते तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गोरगरिबांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या आपत्तीमुळे पुरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासू लागली आहे. अशा कठीण प्रसंगी नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला गेला.
आज, शुक्रवारी पाकीजा फंक्शन हॉल येथे 5000 राशन किटचे वाटप करण्यात आले. या वेळी खासदार रविंद्र पा. चव्हाण, दक्षिण जिल्हाध्यक्ष हणमंतराव पा. बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमास काँग्रेस महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार, मुफ्ती अय्युब खासमी, हाफेज सरवर कासमी, हाफेज अब्दुल हफीज, मौलाना अब्दुल रज्जाक, हाफेज सईद, माजी उपमहापौर मसूद अहमद खान, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, माजी सभापती फारुख अली, माजी उपमहापौर अब्दुल गफार, माजी नगरसेवकसय्यद शेरअली, मुन्तजोबोद्दीन, नासेर भाई, लतिफ भाई, अलीम खान, अजीज कुरेशी, हबीब बागवान, फसीउद्दीन भाई, अब्दुल मुख्तार उर्फ बल्लू, रहीम अहमद खान, चाँद भाई, फहीम भाई, बाबू खोकेवाले, वहाब भाई, हबीब बावजीर, शोऐब हुसैन, मोहसीन खान, बालाजी चव्हाण, महेश देशमुख, विठ्ठल पावडे, दीपकसिंह हजुरिया यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्या या उपक्रमामुळे पुरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळाला असून उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना पुढील काळातही आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले. (छायाचित्र : ज्ञानेश्वर सुनेगावकर)



