जिला

इंदिरा गांधी मैदान फटाके व्यावसायिकांना देण्याचा निर्णय चुकीचा

मैदान खेळाडू व पोलीस भरतीसाठी खुला करावा : शिवसेनेचे निवेदन

 

नांदेड (प्रतिनिधी) : शहरातील इंदिरा गांधी मैदान महापालिकेने फटाके व्यावसायिकांना लिलावाद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याची भूमिका शिवसेनेतर्फे घेण्यात आली आहे.

या मैदानावर मोठ्या संख्येने तरुण पोलीस भरतीसाठी सराव करतात. येत्या काळात भरती होणार असल्यामुळे या तरुणांच्या भवितव्यासाठी मैदान आवश्यक आहे. हे मैदान खेळाडूंच्या अथक प्रयत्नातून उपलब्ध झाले असून येथे फुटबॉल आणि क्रिकेट खेळाडू सराव करीत असतात. फुटबॉल खेळाचे राज्यस्तरीय सामनेही याच मैदानावर आयोजित केले जातात.

श्री. गुरु गोविंदसिंह स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविल्यानंतर सरावासाठी स्थानिक खेळाडूंना प्रवेशबंदी घालण्यात आली. मात्र अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांना मात्र अटकाव करण्यात आलेला नाही. सरकारी अधिकारी व ज्येष्ठ नागरिकांना मात्र शुल्क आकारून मैदान उपलब्ध करून दिले जाते, पण कमी वयाच्या खेळाडूंना दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

मैदान सुरक्षित करून इंदिरा गांधी तसेच गुरु गोविंदसिंह स्टेडियम दोन्ही खेळपट्ट्या पोलीस भरती सराव व खेळाडूंसाठी खुल्या कराव्यात आणि फटाके व्यावसायिकांसाठी इतरत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. या संदर्भात आज शिवसेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. किरण अंबेकर व अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *