वाजेगाव बार फोडून चोरी करणारे दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई -10,750 किमतीचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. 4 ऑक्टोबर – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाजेगाव बायपास रोडवरील संदीप बार फोडून चोरी करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून एकूण 10,750 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी. शेख इमरोज शेख अब्दुल रज्जाक (वय 32, रा. जामा मस्जिद जवळ, वाजेगाव, ता.जि. नांदेड), इरफान खान नसरत खान (वय 25, रा. बिलाल मस्जिद जवळ, वाजेगाव, ता.जि. नांदेड)
जप्त मुद्देमाल: रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 एम.एल.च्या 31 बाटल्या (किंमत 7,750) व रोख रक्कम 3,000 — एकूण 10,750 किमतीचा माल.
वाजेगाव बायपासवरील संदीप बारचे शटर फोडून दारूचा एक बॉक्स 12,000 किंमतीचा) आणि रोख 7,000 असा एकूण 19,000 चा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक मा. अविनाश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना चोरी-घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने पो.नि. ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शोध पथकाचे पो.उ.नि. ज्ञानेश्वर मटवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला. दरम्यान, 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.14 वाजता पथकाला गुप्त माहिती मिळाली की, चोरीतील आरोपी वाजेगाव बायपास सर्व्हिस रोडवर माल विक्रीसाठी थांबले आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी संदीप बार फोडून चोरी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात आणखी दोन साथीदार – शेख इलियास शेख खदीर व सोहेल उर्फ छोटा गुज्जर – यांचा सहभाग असल्याचे आरोपींनी सांगितले असून, त्यांचा शोध सुरू आहे.



