नांदेड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी -128 किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट
गांजा व पॉपिस्ट्रा पावडर जाळून नष्ट; न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेल्या प्रकरणांतील मुद्देमालाचा नाश

नांदेड, (जिल्हा विशेष प्रतिनिधी) दि. 1 ऑक्टोबर – नांदेड जिल्ह्यातील पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत 128.325 किलो ग्रॅम गांजा आणि पॉपिस्ट्रा पावडर नष्ट केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत “अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समिती”ने पार पाडली.
नष्ट करण्यात आलेला अंमली पदार्थ मुद्देमाल: गांजा: 105.515 कि.ग्रॅ.
पॉपिस्ट्रा पावडर: 22.810 कि.ग्रॅ. एकूण: 128.325 कि.ग्रॅ.
दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी विविध पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा साठा, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार फायरबट पांगरा येथे जाळून नष्ट करण्यात आला.
ही कारवाई अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीचे अध्यक्ष अविनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या उपस्थितीत पार पडली. समितीमध्ये सदस्य म्हणून सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक, नांदेड), श्रीमती डॉ. अश्विनी जगताप (पोलीस उप अधीक्षक, गृह नांदेड), उदय खंडेराय (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड), तसेच प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे तज्ञ डॉ. माने, डॉ. पाटील, शासकीय पंच, महसूल विभागाचे अधिकारी श्री. सुनिल माचेवाड (नायब तहसीलदार, नांदेड), महेश चलावार (क्षेत्र अधिकारी, म.प्र.नि.मंडळ, नांदेड), आणि ब्रम्हानंद सावते (वैद्य मापन शास्त्र निरीक्षक, वजन मापे कार्यालय, नांदेड) उपस्थित होते.
सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुद्देमालाचा पंचनामा करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि नियमाप्रमाणे गांजा व पॉपिस्ट्रा पावडर जाळून नष्ट करण्यात आली.
या कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय, ग्रे. पो.उ.नि. श्री. माधव केंद्रे, पोहेकॉ दिलीपकुमार चंचलवार, सखाराम नवघरे, मिलींद नरबाग, पोकॉ रितेश कुलथे व मनोज राठोड यांनी सक्रिय सहभाग घेतला.

