परभणीत राञ ठरली जीवघेणीच : परभणीतील सखल भागातील वसाहतींमध्ये पावसाच्या थैमानीने भयावह चित्र
संसार उपयोगी साहित्य उध्वस्त : आता दिवस कसा काढावा असा कष्टकऱ्यांसोबत प्रश्न ?

परभणी.रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी पहाटे पर्यंत परभणी शहरासह परिसरात ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने दिलेल्या तडाख्याने मध्यवस्तीसह चौहो बाजूंच्या सखल भागातील वसाहतीतून ओंढ्या नाल्यांप्रमाणे पुराचे पाणी वाहत होते ,हजारो घरांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले, त्यामुळे मुलाबाळांसह आबालवृद्धांना तसेच संसार उपयोगी साहित्य व किंमती वस्तू घेऊन त्या सुरक्षित स्थळी हलविण्याकरीता हजारो कुटुंबीयांची मोठी तारांबळ उडाली.
पहाटेपर्यंत म्हणजे पाऊस थांबेपर्यंत हे हजारो कुटुंबीय अक्षरशः जीव मुठीत घेऊन सुरक्षितस्थळी पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत होते.सकाळी पाऊस थांबला खरा, परंतु प्रत्येक वसाहतीत पावसाच्या पाण्याने केलेल्या थैमानाची विदारक दृश्य दिसून येऊ लागली. काही वसाहती मधून अक्षरशः गुढग्यावर ऐवढे,पाणी साचले होते.
मध्यवस्तीसह चौहो बाजूंच्या वसाहतीतील पावसाचे तसेच नाल्यातील सांडपाण्याचे विल्लेवाटी लावणारी यंत्रणाच अस्तित्वात नसल्यामुळे संपूर्ण शहर हे जलमय झाले होते. दरम्यान या अतिवृष्टीने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही, परंतु शेकडो नागरिकांची घरदारे,संसार उपयोगी साहित्यांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे.
हजारो कुटुंबीयांना सोमवारी दिवसभर नाश्त्यासह जेवणखानाची तर दूर चहा पाण्याची सुद्धा कृषी व्यवस्था करावी अशा प्रश्न उभा राहिला होता.



