क्राईम

घरफोडी प्रकरणाचा छडा  स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी, 2 लाख 93 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील घरफोडीच्या मालिकेतील गुन्ह्यांचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी करण लोच्या संगेवाड (वय 19, रा. रेल्वे स्टेशनजवळ, बोधडी, ता. किनवट, जि. नांदेड) यास अटक करून त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व मोबाईल फोन असा एकूण 2,93,460 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस अंमलदार श्रीराम दासरे, माधव माने, संघरत्न गायकवाड, महेश बडगु, देवकत्ते, तसेच सायबर सेलचे कर्मचारी सिटीकर व ओढणे यांचा समावेश होता.

7 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड शहरातील इतवारा भागात पेट्रोलिंग दरम्यान पथकाला गुप्त माहिती मिळाली की, एक संशयित युवक सोने विक्रीसाठी येत आहे. त्यानुसार छापा टाकण्यात आला असता आरोपी करण संगेवाड हा तेथे मिळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व मोबाईल फोन मिळून आले. चौकशीदरम्यान त्याने कबुली दिली की, दोन महिन्यांपूर्वी सिद्धार्थनगर, गोकुंदा व अयप्पा नगर, किनवट येथील घरफोडी प्रकरणात त्याने ही चोरी केली होती.

सदर गुन्ह्यांसंदर्भात पोलीस ठाणे किनवट येथे गुन्हा नोंद असून आरोपीस पुढील कारवाईसाठी तेथे हस्तांतरित करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *