मराठवाडा

परभणीत काँग्रेस च्या जिल्हाकचेरीवर निषेध मोर्चा..?

 

परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून जिल्हाधिकार्यालयापर्यंत काँग्रेसचे पदाधिकारी यांनी काढला निषेध मोर्चासर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर न्यायालयामध्ये एका मनुवादी विचारसरणीच्या वकीलाद्वारे भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या विरोधात परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बुधवार 8 ऑक्टोबर रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या वकिलाचे राष्ट्रीयत्व रद्द करून न्यायव्यवस्थेचा सन्मान करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आज दिलेल्या निवेदनावर नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, भगवान वाघमारे, गुलमीर खान, खदीर हाश्मी, रवी सोनकांबळे, ॲड. सय्यद एजाज, अतिक रहेमान, आशिष वाकोडे, पठाण दुराणी, ॲड. मुजाहेद, अभय देशमुख, अमोल जाधव सह
काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *