क्राईम

मिरचीपुड डोळ्यात फेकून जबरी चोरी करणारा आरोपी सहा तासांत अटकेत – नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कामगिरी, 1,22,850 मुद्देमाल जप्त

 

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या सहा तासांच्या आत मिरचीपुड डोळ्यात फेकून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करत 1,22,850 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव शेख सलमान शेख अन्वर (वय 28 वर्षे, व्यवसाय ऑटोचालक, रा. खुदबेनगर चौक, हिंदुस्तान मेडिकल जवळ, नांदेड) असे आहे.

जप्त मुद्देमाल: नगदी रक्कम 95,850/-, सॅमसंग कंपनीचा टॅब (किंमत 22,000/-)
बायोमेट्रिक मशीन (किंमत 5,000/-), एकूण मुद्देमाल 1,22,850/-

फिर्यादी भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेडचे संघ व्यवस्थापक हे बचत गटाची वसुली करत असताना त्यांच्या जवळ वरील रक्कम व साहित्य होते. यावेळी जवाद कॉलनी येथील ईदगाह मैदानाच्या बाजूस एका अज्ञात इसमाने त्यांच्या डोळ्यात मिरचीपुड फेकून पैशाची बॅग व इतर साहित्य जबरीने हिसकावून पळ काढला.

या घटनेवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केवळ सहा तासांत आरोपीचा शोध लावून त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरी केलेला मुद्देमाल — रोख रक्कम 95,850, सॅमसंग टॅब 22,000 आणि बायोमेट्रिक मशीन 5,000 असा एकूण 1,22,850 — हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *