क्राईम

घरफोडीचे २ व मोटारसायकल चोरीचे ३ गुन्हे उघड – १ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी - दोन आरोपी जेरबंद

 

 

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यात घरफोडी आणि मोटारसायकल चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी करत घरफोडीचे २ गुन्हे आणि मोटारसायकल चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणत एकूण १ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —ऋषीकेश मारोती चांदोडे (वय २३ वर्षे, व्यवसाय – बेकार)
आकाश पुंजाराम वानोळे (वय २२ वर्षे, व्यवसाय – बेकार), दोघे रा. खरबी, ता. भोकर, जि. नांदेड.

जप्त मुद्देमालामध्ये नगदी ६५,५०० रुपये आणि ४ हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकली (किंमत १,२५,००० रुपये) असा एकूण १,९०,५०० रुपयांचा माल समाविष्ट आहे.

अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी जिल्ह्यात वाढत्या चोरी व घरफोडीच्या घटनांचा तपास गतीमान करण्याचे आदेश उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना दिले होते.

या आदेशानुसार दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे आणि त्यांचे पथक उपविभाग नांदेड ग्रामीण व भोकर भागात गस्त घालत असताना बारड परिसरात गेले असता गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दोन इसम चोरीच्या मोटारसायकलीवर फिरत आहेत आणि ते खरबी गावाच्या पाटीजवळ थांबले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे वरीलप्रमाणे सांगितली. विश्वासात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर आरोपींनी खरबी, रेल्वे स्टेशन नांदेड आणि भैसा (तेलंगणा) येथून ३ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

तसेच त्यांनी पोलीस ठाणे बारड हद्दीतील मैत्री बार व मराठा बारमध्ये प्रवेश करून विदेशी दारू चोरी केल्याचेही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांच्या नोंदींची पाहणी केली असता पुढील गुन्हे उघडकीस आले —

पो.स्टे. बारड गु.र.नं. 04/2025 कलम 331(4), 305(A) भा.दं.वि.
पो.स्टे. बारड गु.र.नं. 65/2025 कलम 331(4), 305(A) भा.दं.वि.
पो.स्टे. भोकर गु.र.नं. 156/2025 कलम 303(2) भा.दं.वि.
पो.स्टे. वजीराबाद गु.र.नं. 310/2025 कलम 303(2) भा.दं.वि.
तसेच भैसा (तेलंगणा) येथेही मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा उघड झाला आहे.

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *