महाराष्ट्रा
नांदेड – निझामुद्दीन दरम्यान विशेष रेल्वे गाडीची सोय

सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेमार्फत हुजूर साहिब नांदेड ते हजरत निझामुद्दीन दरम्यान एकतर्फी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडीचा तपशील : गाडी क्र. 07699 हुजूर साहिब नांदेड ते हजरत निझामुद्दीन विशेष ;
•प्रस्थान : हुजूर साहिब नांदेड वरून दिनांक 12.10.2025 (रविवारी) रात्री 22.55 वाजता सुटेल
•आगमन : हजरत निझामुद्दीन मंगळवारी सकाळी 09.30 वाजता पोहोचेल
गाडीचे थांबे:
पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम अकोला, शेगाव , मलकापूर, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ग्वालीयर, ढोल्पूर, आग्रा, पळवल, निझामुद्दीन गाडीची रचना: 20 डबे (स्लीपर आणि जनरल )



