क्राईम

गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

 

नांदेड (प्रतिनिधी) : गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या रेती माफियांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, एकूण ₹15,81,250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी गजानन संभाजी येवले (वय 25, व्यवसाय चालक, रा. मार्कड, ता.जि. नांदेड)
गणेश जीवनराव दळवे (वय 35, व्यवसाय मालक/चालक, रा. वडेपुरी, ता. लोहा, जि. नांदेड), मोहन गोविंद येवले (वय 27 वर्षे), गजानन येवले, मदन दत्तात्रय येवले, ज्ञानेश्वर येवले — सर्व रा. मार्कड, ता. जि. नांदेड

जप्त मुद्देमाल : लाल रंगाचा ट्रॅक्टर (MH 26 CP 7123) — किंमत ₹7,00,000
अंदाजे सव्वा ब्रास रेती — किंमत ₹6,250, रेती उपसा करणारे इंजिन — किंमत ₹2,00,000, 08 तराफे — किंमत ₹4,00,000, 55 ब्रास रेती — किंमत ₹2,75,000
एकूण जप्त मालमत्ता : ₹15,81,250

मा. श्री. अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी *“ऑपरेशन फ्लश आऊट”* अंतर्गत अवैध गौण खनिज उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याच आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली 12 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी कारवाई करण्यात आली.

मार्कड येथील गोदावरी नदी पात्रात अवैध रेती उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकून ट्रॅक्टरसह रेती, इंजिन व तराफे जप्त केले. काही मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *