जिला

वजिराबाद पोलिसांकडून बेवारस १६८ वाहनांचा जाहीर लिलाव

नांदेड (प्रतिनिधी) आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम (पोस्टे वजिराबाद) यांच्या नेतृत्वाखाली बेवारस वाहनांचा सार्वजनिक लिलाव आयोजित करण्यात आला. या लिलावात एकूण १६७ मोटारसायकली आणि १ टेम्पो, अशा एकूण १६८ वाहनांचा लिलाव करण्यात आला.

लिलाव प्रकिया पारदर्शक पद्धतीने पार पडली. लिलावाबाबत नियमाप्रमाणे स्थानिक दैनिकांमध्ये जाहीरात देण्यात आली होती. ज्यांना लिलावात सहभागी व्हायचे आहे अशा इच्छुकांना अनामत रक्कम भरावी अशी सूचना देण्यात आली होती.

लिलावात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र आस्थापना/दुकान अधिनियम प्रमाणपत्र, दुकानाचा परवाना, स्क्रॅपिंग लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य होते. सर्व अटी व नियमांचे पालन करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या सार्वजनिक लिलावात एकूण ५५ व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला. बेवारस वाहनांच्या लिलावासाठी पोलीस स्टेशन स्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम (पोस्टे वजिराबाद, नांदेड), नायब तहसीलदार स्वप्नील दिघलवार, सपोनि उमाकांत पुणे, पोउपनि उत्तम गुट्टे, आणि पोउपनि रावसाहेब मांडगे – यांचा समावेश होता. समितीच्या उपस्थितीत व नियमानुसार सर्व बेवारस वाहनांचा लिलाव यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *