मतदार यादी अद्यतन करताना प्रचंड गोंधळ थांबवा, काँग्रेस पक्षाने घेतले लेखी आक्षेप

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / मुदखेड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होणार असून त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाद्वारे दि. 8 ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात आरक्षण सोडत पार पडली व नव्याने तयार करण्यात आलेल्या याद्या जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आणि प्रारूप प्रभाग रचनेनुसार मतदार याद्या प्रसिद्ध केले आणि ज्या मतदारांचे नाव एकापेक्षा अनेक प्रभागात असेल तर त्यांना आपल्या निवासस्थान किंवा आधिवास असलेल्या प्रभागात राखायचा असेल तर 13 ऑक्टोबर पर्यंत दावे,
हरकती आणि आक्षेप लेखी स्वरूपात नोंदविण्यासाठी दिलेला दिनाक वाढवून 17 ऑक्टोबर पर्यंत विहित स्वरूपात महत्त्वाचे कागदपत्र सोबत जोडणे बंधनकारक असून असे आवाहन निवडणूक विभागाद्वारे करण्यात आले होते या संबंधित प्रक्रियेवर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कैलास गोडसे यांनी लेखी स्वरूपाचा आक्षेप नोंदवत मतदार याद्यांमधील प्रचंड स्वरूपाचा गोंधळ आणि तांत्रिक बाबी दूर करत मतदार याद्या अद्यतन करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव ,जिल्हाधिकारी नांदेड आणि तहसीलदार मुदखेड यांना केले आहे.
सविस्तर वृत्त असे की मागील काही वर्षापासून रखडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुका 2025 मध्येच पार पडतील अशी दाट शक्यता असून 2016 च्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकूण आठ प्रभाग आणि 17 सदस्य संख्या होती 2011 च्या जनगणनेनुसार आठ प्रभागा ऐवजी एकूण 10 प्रभाग आणि 20 सदस्य असलेली नगरपरिषदेची आरक्षण सोडत गेल्या आठवड्यात पार पडली व लागलीच प्रभागानुसार प्रारूप मतदार यादी जनतेच्या पटलावर ठेवण्यात आल्या यावर काँग्रेस पक्षाने दिनांक 13 ऑक्टोबर रोजी लेखी आक्षेप नोंदवत असा आरोप केला की प्रारूप मतदार यादीत अनेक मतदारांच्या नावाचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने आलेला आहे काही नावांचा समावेश त्या प्रभागात रहिवासी नसलेल्या नागरीकांची नावे मतदार म्हणुन आलेली आहेत त्यांचे आधारकार्ड घेवुन तसेच निवासस्थान संदर्भात राज्य निवडणुक आयोगाच्या नियमानुसार ग्राहय पुरावा, प्रमाणपत्र,
ओळखपत्र तपासुन घेवुन योग्य ती मतदार नोंद करण्यात यावी मतदार यादी अदयावत करण्यात यावी इतरत्र मतदार यादीत नाव नोंद असलेली नावे मुदखेड न.प. प्रभागात आली आहे त्यांचे नाव, त्यांचा मुळ रहिवाशी पुरावा पाहुन इतरत्र पाठविण्यात यावी जेणेकरून संविधानानुसार लोकशाही बळकट करण्यासाठी सन 2025 ची सार्वत्रिक निवडणुक पारदर्शकपणे पार पडतील अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गोडसे यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जगदीश दळवी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराला प्रतिसाद देत मतदार याद्या अद्यतन करताना राज्य निवडणूक आयोगाच्या दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच आणि पारदर्शकपणे मतदार याद्या तयार करण्यात येतील स्थानिक पातळीवर काही नागरिकांत अपप्रचार व अफवा पसरण्यात आली असून अशा गोष्टींमध्ये तथ्य नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.



