आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उदया आढावा बैठकीचे आयोजन

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम
मुदखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजित पवार गटाची स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आढावा बैठक आयोजन दि. 16 ऑक्टोबर रोजी करण्यात आल्याची माहिती स्थानिक पत्रकार देण्यात आली.
आगामी काळातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातून शहरात नगरपरिषदेतील एकूण दहा प्रभागातून उमेदवाराची चाचपणी व आढावा बैठकीचे आयोजन नांदेड रोड स्थित ओंकार कॉम्प्लेक्स येथे दिनांक 16 ऑक्टोबर दुपारी ठीक 04.00 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती असून बैठकीत कंधार लोहा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्कराव पाटील खतगावकर,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव दादाराव पाटील ढगे तसेच माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व फ्रंटलचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार या बैठकीत मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन भोकर विधानसभा अध्यक्ष शिवाजी पाटील लगळुदकर,मुदखेड तालुका अध्यक्ष आनंद टिप्परसे , शहराध्यक्ष मोहम्मद बुराहान
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नुमंत पाटील नटूरे यांनी केले आहे



