भाग्यनगर गुन्हे शोध पथकाकडून वाहन चोरीचा पर्दाफाश – तीन मोटारसायकलींसह ७०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. १५ ऑक्टोबर (प्रतिनिधी): भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून तीन मोटारसायकली हस्तगत करून सुमारे ७०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त केलेल्या वाहनांमध्ये बजाज कंपनीची NS पल्सर (क्र. MH-22 AY-5522) किंमत ३०,०००/-, हिरो कंपनीची पॅशन प्रो (क्र. MH-26 U-3345) किंमत २०,०००/-
हिरो कंपनीची स्प्लेंडर (क्र. MH-26 W-238) किंमत ₹२०,०००/-, असा एकूण ७०,०००/- किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी गणेश ऊर्फ चुहा बालाजी हिंगोले (वय १९ वर्षे, व्यवसाय – बेकार, रा. देगावचाळ, नांदेड) यास अटक केली असून त्याच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अलीकडेच वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. वाडेवाले, पो.उप.नि. देशमुख व त्यांचा स्टाफ गस्त घालत असताना, आसना ब्रिज परिसरात काही संशयित तरुण मोटारसायकलसह थांबले असल्याची माहिती मिळाली.
तेथे जाऊन पाहणी केली असता, आरोपी गणेश हिंगोले व त्याचे तीन साथीदार हे दोन मोटारसायकलींसह आढळले. कागदपत्रांची चौकशी केली असता त्यांनी सदर वाहने चोरीची असल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांच्याकडून आणखी एक चोरीची मोटारसायकल (NS पल्सर) हस्तगत करण्यात आली.



