नांदेडमध्ये एमआयएमचा निवडणूक आढावा बैठक, सर्व स्थानिक निवडणुकांत सक्रिय सहभागाची घोषणा

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) तर्फे महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात आज तहा सिल्वर पॅलेस, नांदेड येथे एक महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीस मजलिसचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस जनाब साजिद बिल्डर यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, मजलिस आपल्या संपूर्ण ताकदीने सर्व निवडणुकांमध्ये सहभागी होणार आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने तन-मनाने तयारीस लागले पाहिजे.
या वेळी जनाब फिरोज खान लाला आणि मिर्झा अमजद बेग यांनीही भाषण करताना सांगितले की, पक्षाच्या प्रत्येक सैनिकाने संघटित पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, जेणेकरून लोकांच्या मूलभूत समस्यांच्या निराकरणासाठी मजलिस एक मजबूत व्यासपीठ म्हणून उभे राहील.
शेवटी जोशपूर्ण वक्ते सय्यद मुईन यांनी उत्साही शब्दांत कार्यकर्त्यांना आवाहन केले की, आपल्याला आपल्या आपल्या वॉर्डपासूनच निवडणुकीची तयारी सुरू करायची आहे, कारण आपला उद्देश लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
बैठकीचे संचालन सामाजिक कार्यकर्ते जनाब अल्ताफ सर यांनी केले. या बैठकीला मजलिसचे अनेक जबाबदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



