नांदेड जिल्हा बास्केटबॉल स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पुरुष व महिला बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा दिनांक ११ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान उत्साहात पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आणि पारितोषिक वितरण सोहळ्यास जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, असोसिएशनचे अध्यक्ष निखिल लातूरकर आणि उपाध्यक्ष सरदार हरबिंदर सिंग संधू उपस्थित होते.
अंतिम क्रमवारी:
महिला विभाग:
डीसीसी स्टेडियम मुली
एनडब्ल्यूसीएमसी एस क्रमांक ३
एसजीजीएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी

पुरुष विभाग:
नेक्सस अकादमी
टीम बॅलर्स
नांदेड पोलीस
स्पर्धेनंतर नांदेड जिल्ह्यासाठी संभाव्य संघ जाहीर करण्यात आला असून, पुरुष आणि महिला गटांसाठी प्रशिक्षण शिबिर १६ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत स्टेडियम बास्केटबॉल कोर्टवर घेण्यात येईल.
असोसिएशनचे सचिव विनोद गोस्वामी यांनी स्पर्धेतील सर्व खेळाडू, आयोजक आणि सहकार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांनी विशेषत: डॉ. विष्णू शिंदे, सोहन सोनकांबळे, नागसेन वाधवे, संदीप निखाते, सुहास कांबळे तसेच टीम बॅलर्स च्या संपूर्ण संघाचे कौतुक केले.
जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष सरदार हरबिंदर सिंह संधू यांनी जाहीर केले की, राज्यस्तरीय स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणाऱ्या नांदेड जिल्हा संघाला १५,००० चे बक्षीस दिले जाईल.



