शहर

GIO महाराष्ट्र साऊथ झोन आयोजित “सीरत-उन्नबी क्विझ कॉम्पिटिशन 2025” मध्ये अल-रिदवानच्या विद्यार्थिनींची उत्कृष्ट कामगिरी

नांदेड : (प्रेस नोट) GIO महाराष्ट्र साऊथ झोन तर्फे “सीरत-उन्नबी ﷺ क्विझ कॉम्पिटिशन 2025” हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. या स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. हा परीक्षा उपक्रम 21 सप्टेंबर रोजी घेण्यात आला होता, तर त्याचे निकाल 2 ऑक्टोबर रोजी Seerat-un-Nabi Quiz Convention Day च्या निमित्ताने जमात-ए-इस्लामी हिंद, नवी आबादी, नांदेड येथील कार्यालयात घोषित करण्यात आले.

या स्पर्धेत अल-रिदवान स्कूलच्या विद्यार्थिनींनी अत्यंत उल्लेखनीय यश संपादन केले.

Class 5 ते 7 गटात :
इंशराह खानम हसन खान पठाण (5वी) — प्रथम क्रमांक
इंशराह तज्वीद तनवीर हुसेन फारुकी (5वी) — तृतीय क्रमांक
हसीबा लतीफुद्दीन इनामदार (6वी) — चतुर्थ क्रमांक
जोहा झैनब सैय्यद सबील पाटील (6वी) — पंचम क्रमांक

Class 8 ते 10 गटात :
खदीजा तहरीम अब्दुल माजिद (9वी) — प्रथम क्रमांक
आमिना बेगम शेख अन्वर (10वी) — द्वितीय क्रमांक
शारिया मुझस्सम मोहम्मद सिद्दीक़ (10वी) — तृतीय क्रमांक

या सर्वांमुळे अल-रिदवान स्कूलच्या 7 विद्यार्थिनी झोनल लेव्हल टॉपर ठरल्या. त्याशिवाय अनेक विद्यार्थिनींनी उत्कृष्ट गुण मिळवत सन्मानपत्रे प्राप्त केली.

तसेच अल-रिदवान उर्धापूर येथील विद्यार्थिनी अदिना अस्फरीन खतीब इस्म अहमद (5वी) हिने सीरत-उन्नबी ﷺ एक्झिबिशन मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केले.

या यशस्वी कामगिरीमुळे हे स्पष्ट झाले की अल-रिदवान संस्था विद्यार्थ्यांना केवळ आधुनिक शिक्षणच नव्हे तर धार्मिक शिक्षणातही उच्च दर्जाचे मार्गदर्शन देत आहे.

या उत्कृष्ट यशाबद्दल संस्थेचे डायरेक्टर अब्दुर रशीद सर, अध्यक्ष अब्दुल वहिद सर, प्राचार्या सैय्यद तहसीन फातिमा, तसेच अल-रिदवान ज्युनिअर कॉलेज अँड ग्रुप ऑफ स्कूल्सच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *