जिला

इकबाल नगर-वाजेगाव परिसरात वीज कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू – परिसरात शोककळा पसरली

 

नांदेड, धनेगाव (प्रतिनिधी शेख बाबा): आज सायंकाळी इकबाल नगर-वाजेगाव परिसरात झालेल्या भीषण घटनेत वीज कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव शेख अल्ताफ शेख खैयुम (वय अंदाजे 28 वर्षे) असे असून तो राहणार इकबाल नगर, धनेगाव आहे.

शेख अल्ताफ हे व्यवसायाने गुत्तेदार होते तसेच स्थानिक किटकॅट क्रिकेट टीमचे लोकप्रिय खेळाडू म्हणून ओळखले जात होते. आज सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरण ढगाळ झाले आणि पावसासह वीजांचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी अल्ताफ काही मित्रांसह वाजेगाव परिसरात होते. जोरदार पाऊस सुरू झाल्याने त्यांनी एका झाडाखाली आसरा घेतला, मात्र काही क्षणांतच वीज त्या झाडावर कोसळली. वीज कोसळताच अल्ताफ यांचा मोबाईलही फुटला आणि ते जागीच बेशुद्ध झाले.

सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या दवाखान्यात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मित्रपरिवार, क्रिकेटप्रेमी व स्थानिक नागरिकांत दुःखाचे वातावरण आहे.

शेख अल्ताफ हे उत्साही, खेळाडूवृत्तीचे व सर्वांच्या मदतीला तत्पर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनाने इकबाल नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अशा नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमध्ये जनजागृती व बचाव उपाययोजना वाढविण्याची मागणी केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *