जिला

पूरग्रस्तांच्या घरांचे सर्वेक्षण तातडीने करा; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

 

नांदेड नांदेड लोकसभेचे खासदार मा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि माजी महापौर तथा शहर काँग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या सुचनेनुसार, शहरातील पूरग्रस्त नागरिकांच्या तातडीच्या प्रश्नांवर शहर काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे शहरातील अनेक भागातील गोरगरीब जनता बाधित झाली आहे. मात्र, या भागातील अनेक नागरिकांच्या घरांचे अद्याप सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे त्यांची नावे शासनाच्या पूरग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.

या नागरिकांना घरे सोडून इतर ठिकाणी राहावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेस कमिटीने प्रशासनाला तातडीने सर्वेक्षण करून पूरग्रस्तांना शासनाकडून आर्थिक अनुदान मंजूर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या प्रसंगी माजी उपमहापौर अब्दुल गफार, माजी नगरसेवक सय्यद शेर अली, हबीब बागवान, अब्दुल अजीज कुरेशी, अब्दुल फहीम, अब्दुल रहीम, रमेश गोडबोले, अब्दुल लतीफ, मोहम्मद नासेर, बाबू भाई खोकेवाला, सय्यद फसी, अब्दुल मुख्तार उर्फ बल्लू सेठ, सय्यद शोएब, अब्दुल वहाब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *