नांदेड शहरातील जलवाहिनीला गळती; २५ व २६ ऑक्टोबरला काही भागात पाणीपुरवठा खंडित

नांदेड शहरातील कोटीतीर्थ पंपगृह ते काबरानगर जलशुध्दीकरण केंद्र आणि डंकीन जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत जाणाऱ्या ११०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला थुगावजवळ गळती झाली आहे. सदर गळतीची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने,
दिनांक २५.१०.२०२५ व २६.१०.२०२५ रोजी काबरानगर जलशुध्दीकरण केंद्र (६० MLD पैकी ३५ MLD) तसेच डंकीन जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार आहे.
या कालावधीत खालील भागांचा पाणीपुरवठा दोन दिवस उशीराने होईल:
तरोडा बु., तरोडा खु., सांगवी, वर्कशॉप क्र. ०१, ०२ व ०३, सुंदरनगर, दरवेशनगर, डॉ. आंबेडकरनगर, राममंदिर, गोकुळनगर, लेबर कॉलनी, नाना नानी पार्क, नंदीग्राम, यात्री निवास, हैदरबाग, बॉवार, ट्रेंचिंग ग्राऊंड, शक्तीनगर तसेच डंकीन जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा खडकपुरा, रेल्वेस्टेशन व वजीराबाद परिसर.
नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा व नांदेड वाघाळा महानगरपालिकेस सहकार्य करावे, ही विनंती.



