महाराष्ट्रा

नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)–नांदेड अशी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय

 

सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा भार कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेमार्फत नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)–नांदेड अशी विशेष TOD गाडी चालविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 07031 नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल LTT विशेष:

ही गाडी दिनांक 26 ऑक्टोबर 2025 (रविवार) रोजी रात्री 21:00 वाजता नांदेडहून सुटेल आणि पुढील दिवशी दुपारी 15.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 07032 लोकमान्य टिळक टर्मिनल –नांदेड विशेष:

ही गाडी दिनांक 27 ऑक्टोबर 2025 (सोमवार) रोजी सायंकाळी 16:10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT) वरून सुटेल आणि 28 ऑक्टोबर 2025 (मंगळवार) रोजी सकाळी 11:30 वाजता नांदेड येथे पोहोचेल.

ही गाडी पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, मुरुड, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, ठाणे येथे दोन्ही दिशेला थांबते.

गाडीची रचना: ट्रेनमध्ये वातानुकूलित, स्लीपर आणि जनरल कोच आहेत. 20 कोचेस

भाडे: सामान्य भाड्याच्या 1.3 पट आकारले जाईल.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *