कार्तिकी एकादशी निमित्त आदिलाबाद – पंढरपूर विशेष रेल्वे गाड्या

कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करता, दक्षिण मध्य रेल्वेने आदिलाबाद – पंढरपूर – आदिलाबाद या मार्गावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
गाडी क्रमांक 07613 / 07614 आदिलाबाद – पंढरपूर – आदिलाबाद विशेष गाड्या:
• गाडी क्रमांक 07613 (आदिलाबाद – पंढरपूर):
आदिलाबाद येथून दिनांक 31.10.2025 शुक्रवार व 04.11.2025 मंगळवार रोजी सकाळी 08:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 02:00 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 07614 (पंढरपूर – आदिलाबाद):
पंढरपूर येथून दिनांक 01.11.2025 शनिवार व 05.11.2025 बुधवार रोजी रात्री 20:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:15 वाजता आदिलाबादला पोहोचेल.
या विशेष गाड्या पुढील स्थानकांवर थांबतील:
किनवट, बोधडी बुजुर्ग, धनोरा डेक्कन, सहस्रकुंड, हिम्मायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, , लातूर रोड, लातूर, हरंगुळ, औसा रोड, ढोकी, येडशी, धाराशीव, पांद्री, बार्शी टाउन, शेंगरी , कुरडुवाडी, आणि मोडलिंब.
या विशेष गाड्यांमध्ये एसी, स्लीपर कोच तसेच साधारण दुसऱ्या वर्गाचे कोच असतील, ज्यामुळे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या भक्तांना सोयीस्कर सुविधा उपलब्ध होतील.
वेळापत्रक सोबत जोडले आहे,



