जिला

अवैध रेती उत्खनन करणारे साहित्य नष्ट नांदेड महसूल पथकाची कारवाई 63 लाख किंमतीचा मुद्देमाल नष्ट

नांदेड, दि. 29 ऑक्टोबर : आज 29 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद, ग्राम महसूल अधिकारी, मनोज जाधव, माधव भिसे, बरोडा श्रीरामे, जमदाडे, मनोज सरपे, महेश जोशी, महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे या महसूल पथकाने विष्णुपुरी परिसरामध्ये पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना रेती उत्खनन करणारे 2 मोठ्या बोटी, एक छोटी बोट व 4 इंजिन आढळून आले.

या पथकाने मजुरांच्या साह्याने 3 बोटी व 4 इंजिन जिलेटीने स्फोट करून नष्ट केले. तसेच 30 तराफे जाळून नष्ट केले, असे एकूण 63 लाख किंमतीचा मुद्देमाल जाग्यावरच स्फोट करून नष्ट केला. एक अवैध वाहतूक करणारी हायवा एमएच 26 बीसी 4892 जप्त करून तहसील कार्यालय परिसरामध्ये लावण्यात आला आहे. सदर हायवावर दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची तजवीच करण्यात आली आहे.

या कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व पोलीस जमादार शिंदे, श्री. घुगे व श्री. जाधव यांचे पोलीस पथक उपलब्ध करून दिले. अवैध उत्खननासंदर्भात नांदेड महसूल प्रशासन सक्तीने कारवाई करेल असा इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *