पुरग्रस्तांना मदत न मिळाल्याने आजपासून अब्दुल गफ्फार यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड शहरातील पुरग्रस्तांना प्रशासनाकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने, माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.
त्यांच्यासोबत माजी नगरसेवक मोहम्मद नासेर, मोहम्मद लतीफ लोखंडवाला, बाबूभाई खोकेवाले, शमीम अब्दुल्ला, अब्दुल हाफिज बागवान, सुरेश हटकर, सय्यद शेर अली, अब्दुल रहीम, अजीज कुरेशी, रमेश गोडबोले, रहीम अहमद खान, अब्दुल फहीम, अब्दुल मुख्तार, सय्यद फसीउद्दीन आणि अब्दुल हबीब आदी नगरसेवकही या उपोषणात सहभागी झाले आहेत.
अब्दुल गफ्फार यांनी सांगितले की, “नांदेड शहरात मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे हजारो नागरिकांचे घर, संसारोपयोगी साहित्य आणि अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. परंतु प्रशासनाकडून अद्याप त्यांचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही आणि आर्थिक मदतही दिलेली नाही.
जोपर्यंत प्रशासन पुरग्रस्तांचे सर्वेक्षण करून त्यांना न्याय मिळवून देत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वातावरण चांगलेच तापले असून, नागरिक आणि सामाजिक संघटनांचे लक्ष या उपोषणाकडे वेधले गेले आहे.
आंदोलना खासदार रविंदर वसंतराव चव्हाण यांनी भेट दिली



