मुदखेड पोलीस व महसूल विभागाची संयुक्त कारवाई – 60 लाखांचा अवैध वाळू उपसा साहित्य नष्ट


नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली आहे. “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली असून या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठा आघात झाला आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी वाळू माफियांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आदेश दिल्यानंतर, मुदखेड पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, वासरी आणि शंखतीर्थ परिसरात काही जण अवैधरित्या वाळू उपसा करत आहेत.

या माहितीच्या आधारे 06 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 5 वाजता पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान खालील साहित्य जागीच नष्ट करण्यात आले-
पाच छोट्या बोटी (प्रत्येकी 7 लाख) – 35,00,000
तीन तराफे -2,00,000
एक वाळू उपसा इंजिन – 3,00,000
मोठा फायबर – 20,00,00
एकूण मुद्देमाल किंमत 60,00,000
संपूर्ण साहित्य महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिलेटिनच्या साहाय्याने उडवून नष्ट करण्यात आले.
कारवाईत पोनि धीरज चव्हाण, पोह. कवठेकर, कदम, पोकों वानोळे, कारामुंगे, शिंगारपुतळे (पोस्टे मुदखेड) तसेच तहसीलदार आनंद देऊळगावकर, नायब तहसीलदार श्री. जगताप आणि त्यांच्या पथकाचा सहभाग होता.



