मराठवाडा
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा भार कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेमार्फत नांदेड – चेरलापल्ली विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.


गाडी क्रमांक 07666 नांदेड – चेरलापल्ली एकतर्फी विशेष गाड़ी:-
ही गाडी दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 08:00 वाजता नांदेड वरून सुटेल आणि दुपारी 15:00 वाजता चेरलापल्ली येथे पोहोचेल.
ही गाडी मुदखेड, धर्माबाद, बासर, निज़ामाबाद, कामारेड्डी, मेडचल मार्गे धावेल
या गाडीत 24 डब्बे असतील.
गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.





