गुटखा माफियाविरुद्ध भोकऱ पोलिसांची मोठी कारवाई -7,62,020 किमतीचा मुद्देमाल जप्त
ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत धडक तपास मोहीम : एक आरोपी अटकेत


भोकर (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस स्टेशनच्या पथकाने गुटखा माफियाविरुद्ध मोठी कारवाई करत राज्य शासनाने बंदी घातलेला पान मसाला व गुटखा वाहतूक करणाऱ्यांना पकडले. पोलिसांनी या कारवाईत एकूण ₹7,62,020** रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपींची नावे व पत्ते: शेख तन्वीर शेख अहमद (वय 27 वर्षे), व्यवसाय: चालक, रा. सईद नगर, भोकर., नईम जिलानी कुरेशी, व्यवसाय: व्यापारी, रा. सईद नगर, भोकर.
आर. आर. आमान (पूर्ण नाव माहित नाही)., रिझवान, रा. हिमायतनगर, ह.मु. भैसा (पूर्ण नाव माहित नाही).

जप्त मुद्देमाल: राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला व गुटखा — किंमत ₹1,62,020/- रुपये., पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्र. MH-44-G-2640) — किंमत ₹6,00,000/- रुपये. एकूण जप्त मुद्देमाल: ₹7,62,020/- रुपये.
ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अजित कुंभार (पो.स्टे. भोकर) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 6 नोव्हेंबर 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते हिमायतनगर जाणाऱ्या रोडवरील बटाळा टी-पॉईंट परिसरात सापळा रचण्यात आला.
या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्र. MH-44-G-2640) संशयास्पद अवस्थेत दिसल्याने तिची तपासणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. यात रजनीगंधा, सिग्नेचर, विमल, राजनिवास सुगंधीत पान मसाला, बाबा 120, तसेच ZN-01 जाफराणी जर्दा अशा विविध ब्रँडचा गुटखा होता.
पोलीसांनी पंचासमक्ष कारवाई करून सर्व मुद्देमाल जप्त केला आणि आरोपी क्रमांक 1 शेख तन्वीर शेख अहमद यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन भोकर येथे संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि शैलेंद्र औटे करत आहेत. पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून, या धाडसी कामगिरीबद्दल अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी भोकर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे व अंमलदारांचे कौतुक केले आहे.



