संत नामदेव घुमान सद्भावना यात्रा गुरुनगरी नांदेड येथे परतली.. पंजाब-हरियाणा-दिल्ली-हिमाचलचा दौरा पूर्ण


७ नोव्हेंबर : नांदेड / महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा अनुभव दिलेली नानक साई फाऊंडेशनची 11 वी “घुमान यात्रा” पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश व दिल्ली येथील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन शुक्रवार,७ नोव्हेंबर रोजी नांदेड येथे परतली असून छत्रपती संभाजीनगर व हजुर साहिब (नांदेड) रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत करण्यात आले.
पानिपत युद्धात शहीद झालेल्या मराठा विराना वंदन करून राजधानी दिल्ली येथे दाखल झालेली घुमान सद्भावना यात्रा काल रात्री मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस ने छत्रपती संभाजीनगर मार्गे नांदेड येथे दाखल झाली. यात्रेत १८० जण सहभागी होते. नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला जातो.
संत नामदेव महाराजांनी मराठीचा झेंडा थेट पंजाबपर्यंत नेऊन पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव निर्माण केला. त्यांच्या कार्याची आठवण कायम ठेवण्यासाठी नानक साई फाउंडेशन दरवर्षी “ना नफा, ना तोटा” तत्वावर घुमानयात्रेचे आयोजन करते.

यात्रा पंजाब-हरियाणा-दिल्ली-हिमाचल प्रदेशचा दौरा पूर्ण करून नांदेड येथे परतली असून जळगाव,मनमाड,छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी रेल्वे स्टेशन वर यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्या हस्ते नांदेड येथे भाविकांचे स्वागत करण्यात आले. यात्रेत नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, वसमतचे माजी नगरअध्यक्ष विजय कडतन, गोविंद सेठ अट्टल,सरदार महेंद्रसिंघ पैदल,एकनाथ मामडे, डॉ रमेश नारलावार, प्रभाकर गाजरे,रामचंद्र उन्हाळे,अॅड राजा वीर, अॅड विश्वंभर राव बचाटे, अशोक कंकरे,पंडितराव सारंग, किशनराव भवर,गोविंद हंबर्डे, डॉ गजानन देवकर,
सौ प्रफुल्ला बोकारे,अरविंद शिंदे, सोपानराव कोकरे,अश्विनी देवकर,प्राजक्ता शिंदे,एम टी कदम, शिवाजी नरहरे, मोहनराव पवार, गणेश साळवे, पांडुरंग भोसले,चरण पवार, बाबुराव रोडगे, पुष्पा जाधव, अरुण कदम, अशोक साखरे, प्रा शिवाजी गोरे, परमेश्वर शिंदे, सुरेश रापते,शंकरराव कुबडे, अॅड जी बी देवकते, प्रा राजेश मुखेडकर, सुनील खोचे,बाबजी काकडे,गंगाधर पांचाळ, डॉ मारोती भोसले,पुंडलिकराव बेलकर, नामदेव कोरडे,अनिल जाधव,धनंजय उमरीकर, जगदीश अहिरे,संजय कदम, बालाजी ढगे, सखाराम गजले, रमेश सज्जन,दत्ता बोकारे पाटील, प्रशांत केंद्रे, राम शेळके, सचिन शिनगारे,बाबू सरोदे यांच्या सह १८० जण सहभागी झाले होते.



