क्राईम

नांदेड हादरलं: ट्युशनवरून घरी जाताना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार – आरोपी अटकेत, नागरिकांचा फाशीच्या शिक्षेचा नारा

नांदेड (प्रतिनिधी) –मुखेड शहरात निष्पाप चिमुकलीवर अत्याचाराचा संतापजनक प्रकार घडला असून, संपूर्ण शहरात संताप उसळला आहे. ट्युशनवरून घरी परतणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीवर एका तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (८ नोव्हेंबर) सायंकाळी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बालिका नेहमीप्रमाणे ट्युशनला गेली होती. सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास ती घरी परतत असताना ओमकार सतीष डाकुरवार (रा. मुखेड) या युवकाने तिला रस्त्यात अडवलं. त्यानंतर त्याने बालिकेला जवळच असलेल्या निर्माणाधीन इमारतीत ओढत नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.

काही वेळाने मुलगी जखमी अवस्थेत सापडल्यावर कुटुंबीयांनी तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी लैंगिक अत्याचार झाल्याची खात्री दिली. ही बातमी समजताच पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

या घटनेने मुखेडमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. शेकडो नागरिकांनी शनिवारी पोलिस ठाण्याचा वेढा घालत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. या आंदोलनात भाजप आमदार तुषार राठोडही सहभागी झाले होते.

मुखेड पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी ओमकार डाकुरवारला अटक केली असून, त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ६५(२), ६४(२), तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ५(एम) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बेंबडे पुढील तपास करत आहेत. हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.

या प्रकारामुळे मुखेडसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, “बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे” असा नारा नागरिकांकडून दिला जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *