मराठवाडा

नांदेड विभागातील विविध प्रवासी गाड्यांना कायमस्वरूपी जनरल कोचेसची वाढ

प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर व अधिक सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील काही प्रवासी गाड्यांमध्ये कायमस्वरूपी जनरल कोचेस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार असून प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होईल.

खाली दिलेल्या प्रत्येक गाडीमध्ये 4 जनरल कोचेस (GS) कायमस्वरूपी वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्यांची रचना पूर्वीच्या 12 कोचेस वरून वाढून आता 16 कोचेस अशी होईल.

खालीलप्रमाणे गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे :

1. गाडी क्र. 57651/57652 नांदेड – मनमाड – नांदेड प्रवासी गाडी
• नांदेडहून वाढ लागू दिनांक 08.11.2025 पासून
• मनमाडहून वाढ लागू दिनांक 09.11.2025 पासून

2. गाडी क्र. 57653 पूर्णा – आदिलाबाद प्रवासी गाडी
• वाढ लागू दिनांक 09.11.2025 पासून (पूर्णाहून)

3. गाडी क्र. 57654 आदिलाबाद – परळी वैजनाथ प्रवासी गाडी
• वाढ लागू दिनांक 10.11.2025 पासून (आदिलाबादहून)

4. गाडी क्र. 57655 परळी वैजनाथ – अकोला प्रवासी गाडी
• वाढ लागू दिनांक 10.11.2025 पासून (परळीहून)

5. गाडी क्र. 57656 अकोला – पूर्णा प्रवासी गाडी
• वाढ लागू दिनांक 11.11.2025 पासून (अकोलाहून)

6. गाडी क्र. 57657/57658 पूर्णा – परळी वैजनाथ – पूर्णा प्रवासी गाडी
• वाढ लागू दिनांक 11.11.2025 पासून (पूर्णा व परळीहून)

या निर्णयामुळे नांदेड विभागातील प्रवाशांना विशेषतः सामान्य वर्गात प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी बनेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *