स्पोर्ट्स

राज्यस्तरीय वरिष्ठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी नांदेडचा संघ जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजबीरसिंग मार्तंड चेरले करणार नेतृत्व

नांदेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली अहिल्यानगर धनुर्विद्या संघटनेतर्फे दिनांक 15 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित 22 वी राज्यस्तरीय वरिष्ठ धनुर्विद्या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्याचा संघ** प्रशिक्षिका तथा सचिव वृषाली पाटील-जोगदंड यांनी जाहीर केला आहे.

कंपाउंड प्रकारात आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजबीरसिंग जहागीरदार आणि राष्ट्रीय खेळाडू मार्तंड चेरले, अथर्व जोंधळे, आकाश गायकवाड, अंकुश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे.तर रिकर्व प्रकारात अजय राठोड आणि इंडियन राऊंडमध्ये रविकांत चव्हाण यांची निवड चाचणीतून निवड करण्यात आली.

निवडचाचणीचे उद्घाटन जिल्हा संघटनेचे सदस्य संजय चव्हाण व तालुका कोषाध्यक्ष मालू कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करताना नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशनचे उपाध्यक्ष हरजींदरसिंग संधू, डॉ. हंसराज वैद्य, श्रीनिवास भुसेवार, सरदार चरणकमलजीतसिंग जहागीरदार, मुन्ना कदम, कोंडेकर बालाजी चेरले, शिवाजी पुजरवाड, सुरेश तमलुरकर, सिधेश्वर शेटे, प्रशांत गवळे, संतोष चुनोडे यांनी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धा संचालक म्हणून मनोज कोलते, सिद्धांत सावंत व स्वयं कांबळे यांनी काम पाहिले.
अहिल्यानगर येथे निवड झालेला महाराष्ट्राचा हा संघ राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे नेतृत्व करणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *