जिला

नांदेड मध्ये कॉंग्रेस – वंचित बहुजन आघाडी एकत्र: “सम-समान-सम्मान” च्या आधारावर आघाडीची घोषणा

 

नांदेड, 11 नोव्हेंबर 2025 नांदेड जिल्ह्यातील १३ नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात ऐतिहासिक आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा खासदार रविंद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली या वेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या आघाडीचा पाया “सम-समान-सम्मान” या तत्त्वावर आधारित असून, दोन्ही पक्षांनी स्थानिक स्तरावर जनहित, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
आघाडी संदर्भातील जागावाटप व रणनीतीसंबंधी चर्चा मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचितच्या राज्य समितीमार्फत जिल्हा स्तरावरील टीमच्या माध्यमातून पार पडली. चर्चेनंतर ठरविण्यात आले की तुर्तास १३ नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी संयुक्तपणे लढणार असून, पुढील निवडणुकांसाठीही परस्पर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
पत्रकार परिषदेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्याचा विशेष उल्लेख करण्यात आला…
वंचित आघाडीने ठाम भूमिका मांडली की “२ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयावर न्यायालयीन निर्णय येईपर्यंत, ओबीसींच्या राखीव जागा फक्त जुण्या ओबीसींनाच दिल्या जाव्यात.” ही मागणी शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेने अधिक बळकट झाली असून, दोन्ही पक्षांनी सामाजिक समतेच्या भूमिकेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मुद्दे:
कॉंग्रेस–वंचित बहुजन आघाडीची “सम-समान-सम्मान”च्या तत्वावर आघाडी
१३ नगरपालिका व नगरपरिषदेतील निवडणुकांमध्ये संयुक्त लढाई बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार व राज्य समीतीच्या मार्गदर्शनात जिल्हा स्तरावर वाटाघाटी करण्यात आल्या…
ओबीसींच्या हक्कासाठी वंचित आघाडीची ठाम भूमिका – शरद पवारांचा दुजोरा…

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *