मराठवाडा

नांदेड विभाग कार्यालयात ‘वार रूम’ चे उद्घाटन

 


दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात आज विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांच्या हस्ते ‘वार रूम’चे उद्घाटन करण्यात आले. या ‘वार रूम’च्या माध्यमातून विभागातील विविध रेल्वे कार्यप्रणालींचे रिअल-टाईम मॉनिटरिंग, नियंत्रण आणि समन्वय अधिक परिणामकारकरित्या करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ विभागीय अधिकारी, शाखा प्रमुख व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या ‘वार रूम’मध्ये आधुनिक कम्युनिकेशन प्रणाली, डेटा अ‍ॅनालिटिक्स स्क्रीन, लाईव्ह ट्रॅकिंग सिस्टीम आणि मॉनिटरिंग साधने बसविण्यात आली असून, यामुळे गाड्यांची वेळपालन, सुरक्षा आणि प्रवासी सुविधा यांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येणार आहे.

“वार रूम ही नांदेड विभागासाठी एक महत्वाची पायरी आहे. विभागातील सर्व शाखांमधील समन्वय वाढवून प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि सुलभ सेवा देणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
वार रूमच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत जलद निर्णय घेणे, गाड्यांचे संचालन नियमन, देखभाल कार्याचे नियोजन तसेच विभागीय नियंत्रण अधिक सक्षम होणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *