मराठवाडा
सिकंदराबाद – नांदेड एकतर्फी विशेष गाडी


प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा भार कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेमार्फत सिकंदराबाद – नांदेड एकतर्फी विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 07690 सिकंदराबाद – नांदेड एकतर्फी विशेष गाड़ी:-
ही गाडी दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 23:30 वाजता सिकंदराबाद वरून सुटेल आणि दुसऱ्या सकाळी 06:30 वाजता नांदेड येथे पोहोचेल.
ही गाडी बोलारम, मेडचल, अकन्नापेट, कामारेड्डी, निज़ामाबाद, बासर, धर्माबाद, उमरी, मुदखेड मार्गे धावेल
या गाडीत 18 डब्बे असतील. गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.




