पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव जागृत करण्यात नानक साई फाऊंडेशन यशस्वी – खासदार प्रा रवींद्र चव्हाण…

नांदेड (प्रतिनिधी) : पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव जागृत करण्यात नानक साई फाऊंडेशन यशस्वी दुआ ठरत असल्याचे प्रतिपादन नांदेड चे खासदार प्रा रवींद्र चव्हाण यांनी येथे केले. येथील नानक -साई फाउंडेशन च्या वतीने दिले जाणारे २०२५ चे संत नामदेव जीवन गौरव पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. लंगर साहिब गुरुद्वारा चे जत्थेदार महान तपस्वी श्रीमान संत बाबा बलविंदरसिंघ जी यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार प्रा रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ जगदीश कदम,नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. खा चव्हाण यावेळी बोलत होते. चैतन्यनगर शिवमंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष माधवराव पटणे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म,पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा अनुभव देणारी नानक साई फाऊंडेशनची घुमान यात्रा महाराष्ट्रासाठी भूषणावह असल्याचे आमदार श्री बालाजी कल्याणकर यांनी सांगितले. पंजाब ची संस्कृती जवळून अनुभवण्यास घुमान यात्रा हे मोठे माध्यम असून या चळवळीत सहभागी होण्यासाठी फाऊंडेशन ने आम्हाला पण संधी द्यावी असे खासदार प्रा रवींद्र चव्हाण म्हणाले.
माजी महापौर मंगलाताई निमकर,नवज्योत फाऊंडेशन चे संस्थापक स.नवनीहालसिंघ जहागीरदार, जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव,सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री सरदार महेंद्रसिंघ पैदल, प्रा कृष्णराव भिसे पाटील,संजय कदम रुईकर,गोविंद शेषराव हंबर्ड, एडवोकेट चिरंजीवीलाल दागडीया ,प्रा. महेंद्र देशमुख,रामराव मीजगर,पुंडलिकराव बेलकर यांना हा पुरस्कार देण्यात आला. नानक साई फाऊंडेशन च्या संत नामदेव घुमान सद्भावना यात्रेला ११ वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त चैतन्यनगर शिवमंदिर नांदेड येथे मावंद व ‘धन्यवाद सभा‘ आयोजित करण्यात आली होती.

या शानदार सोहळ्याला जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे,उपमहापौर आनंद चव्हाण,जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राजेश पावडे,शिवमंदिर चे काशिनाथ महाराज पुजारी,माजी उपनगाध्यक्ष किशोर भवरे,धर्मभुषण श्री दिलीप ठाकूर, प्रा प्रभाकर उदगिरे,नंदकुमार दुदेवार,उदय तोरणेकर,प्रा एस डी बोखारे,रंगनाथराव वाघ, सौ सुमती व्याहळकर,मनोहर पाटील भोसीकर,नानक साई फाऊंडेशन चे उपाध्यक्ष सर्व श्री सुभाष बल्लेवार,तुलसीदास भुसेवार,जी नागय्या, विनायक पाथरकर,सेक्रेटरी सौ प्रफुल्ला पंढरीनाथ बोकारे, संयुक्त सचिव श्रेयस कुमार बोकारे,प्रल्हाद भालेराव,विनायक पाथरकर, संजय कदम रुईकर,गंगाधर पांचाळ, दिलीप अनगूलवार, धनजय पावडे,सौ जयश्री देवसरकर, सौ सविता हंबर्डे,सौ संगीता भालेराव, अश्विनी देशमुख,बालाजी ढगे, गोविंद राऊत,अशोक कंकरे,धनंजय उमरीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी केले.



