माजी नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार पुन्हा मुदखेड निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरणार…

मुदखेड, मोहम्मद हकीम / मुदखेड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचे चिन्ह स्पष्ट होत असून
माजी नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार यांनी पुन्हा पूर्ण ताकतीशी अपक्ष म्हणून माझी कन्या सोफीया अंजुम मुजीब अन्सारी जागीरदार हे नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरणार असल्याचं पत्रकार परिषद मध्ये सांगितले आहे
गेल्या 2017 च्या मुदखेड नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस भाजप आणि अपक्ष या तिरंगी लढत झाली होती काँग्रेसकडून सुनील शेट्टे तर भाजपकडून दिनेश शेटे तर अपक्ष म्हणून मुजीब जागीरदार हे रिंगणात होते . नगराध्यक्ष थेट जनतेतून निवड असल्यामुळे
सर्वाधिक मतदान हे अपक्ष उमेदवार मुजीब जागीरदार यांना मिळाली दोन्ही शेटे यांचा पराभूत करून मुजीब जागीरदार हे मुदखेड चे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.
आता मुदखेड नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलासाठी राखीव असल्यामुळे पुन्हा माझी कन्या सोफीया मुजीब जागीरदार यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उतरणार असल्याचं जागीरदार यांनी सांगितले आहे.
सध्या कोणत्याही राजकीय पक्षाकडून नगराध्यक्षा पदांचे उमेदवारी अजून जाहीर केली नसुन मुजीब जागीरदार यांनी थेट जनतेतून निवडून असल्यामुळे मी पुन्हा नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार असा विश्वास त्यांनी दर्शविलेला आहे.
२०१७ ते २०२२ पर्यंत नगराध्यक्ष पदाचे सूत्र माझ्या हातात होते त्यावेळी जाहीर नाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असुन शहरात झालेल्या विकास कामाचा पाढा वाचत त्यांनी जनतेपुढे पुन्हा मतदान मागण्यासाठी जाणार असून मला मुदखेड ची जनता बहुमताने निवडून देतील असा विश्वास त्यांनी दर्शविलेला आहे.



