मुदखेड काँग्रेस शहराध्यक्ष कैलास गोडसे व तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस नबी साब यांचा राजीनामा
मुदखेड: मोहम्मद हकीम / मुदखेड नगरपरिषद निवडणुक आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी देत असताना काँग्रेसचे अध्यक्ष व तालुका कार्याध्यक्ष यांना विश्वासात न घेता आपल्या मर्जीप्रमाणे पक्षशष्ठीने मुदखेड पालिका निवडणुकीचे बी फार्म दिल्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसचे अध्यक्ष कैलास गोडसे व तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद गौस नबी साब यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे पाठविल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
दिवंगत खासदार कै. वसंतराव चव्हाण व खासदार रवींद्र चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत मुदखेड शहरातून भाजप पेक्षा अधिकची मताधिक्याची लीड काँग्रेस पक्षाच्या पडद्यात पाडून
चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना उमेदवारी टिकटा वरून डावल्यामुळे काँग्रेस शहराध्यक्ष कैलास गोडसे व काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस यांनी राजीनमा दिला आहे…



